Ganeshotsav 2024: मुंबई पोलिसांना वर्दी मध्ये असताना ढोल ताशाच्या तालावर नाचण्यास Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar यांची मनाई; कडक कारवाईचे निर्देश
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिसांनी ढोल ताशाच्या तालावर गणवेशामध्ये असताना टाळावं. कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
महाराष्ट्रामध्ये आज पासून गणेशोत्सव 2024 (Ganeshotsav 2024) ची सुरूवात झाली आहे. घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही आता बाप्पा विराजमान झाला आहे. पुढील दहा दिवस बाप्पाचा सोहळा असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनाला मिरवणूकींचा थाट असतो. पण यामध्ये पोलिसांची खादी अंगावर असताना कुणीही कर्मचार्याने नाचणं टाळावं अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांनी दिल्या आहेत. वर्दीचा मान राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिसांनी ढोल ताशाच्या तालावर गणवेशामध्ये असताना टाळावं. कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणे लक्ष घालावं, कुठेही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी .
Maharashtra | On September 6, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar during the meeting over security and police arrangements for the Ganpati festival, warned all officers that if any policeman is found dancing in uniform, strict action will be taken against them. He said…
— ANI (@ANI) September 6, 2024
दरम्यान मुंबई गणेशोत्सवाच्या काळात 24 तास बाप्पाच्या सेवेमध्ये असते. अनेक मोठ्या मंडळांमध्ये दिवसरात्र भक्तांचा ओघ सुरू असतो. मागील काही दिवसांत महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता आता महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी देखील महिलांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

