Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरणी सागर बर्वे नामक तरुणास पुणे येथून अटक, 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं ही कारवाई रविवारी (11 जून) ही कारवाई केली. सागर बर्वे (वय 34 वर्षे) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिलेप्रकरणी पुणे पोलिसांनी एकास अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं ही कारवाई रविवारी (11 जून) ही कारवाई केली. सागर बर्वे (वय 34 वर्षे) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सागर बर्वे याने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती.
शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी तपास वेगाने सुरु ठेवला आहे. या तपासादरम्यान, सागर बर्वे नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर शरद पवार यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आणखीही काही मुद्दे आणि धागेदोरे हाती येतील असा पोलिसांना विश्वास आहे. त्या दृष्टीनेच पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपीविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घण्यासाठी पोलिसांनी विविध पथकेही तयार करण्यात आली होती. (हेही वाचा, Sharad Pawar Gets Death Threat: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार)
शदर पवार यांना आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलने करत आरोपीवर कारवाईची मागणी केली होती. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि विद्यमान कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवईची मागणी केली होती. राज्यभरात हे प्रकरण चांगलेच तापले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात धमकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. (हेही वाचा, Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ)
दरम्यान, पोलिस तपासात आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे याने सोशल मीडियावर दोन ट्विटर अकाऊंट केली होती. त्यातील एक फेसबुक अकाऊंट होते. ज्याचे नाव 'नर्मदाबाई पटवर्धन' असे होते. या अकाऊंटवरुन शरद पवार यांना उद्देशून पोस्ट केलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'लवकरच तुझा दाभोलकर होणार', अशी धमकी होती. तर सौरभ पिंपळकर या नावाने सुरु असलेल्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेब सोबत करण्यात आली होती. तसेच, आक्षेपार्ह वापरण्यात आली होती.