सावधान! विनाकारण घराबाहेर पडणे पडेल महागात; मुंबई येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 112 गुन्हे दाखल
सध्या भारतातही कोरोनोबाधीत रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊ लागली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक रुग्ण आढळले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सध्या भारतातही कोरोनोबाधीत रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊ लागली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाकडून ठोस पावले उचलली जात आहे. राज्यातील महत्वाची शहरे आणि जिल्ह्याच्या सिमा बंद करुन संपूर्ण राज्यात जमावबंदीचे (Section 188) आदेश लागू केले आहेत. मात्र, काही भागांतील लोकांमध्ये कोरोनाबाबत म्हणावे तितके गांभीर्य दिसून येत नाही. नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडणे टाळवे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. यातच मुंबई शहरात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) कलम 188 अतंर्गत 112 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात हॉटेल आस्थापना , पान टपरी, इतर दुकाने चालू ठेवणारे, तसेच फेरीवाले, सार्वजनिक ठिकाणी गर्दी आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे,
देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स सातत्याने काम करत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये याकरता महाराष्ट्रात राज्य सरकारने खबरदारीचे उपाय घेतले आहेत. ज्यामध्ये रेल्वेसेवा बंद करण्यात आली असून, लोकांना गर्दी टाळण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिवनावश्यक वस्तुंचा अपवाद वगळता सध्या महाराष्ट्रात सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. यात कोरोना संदर्भात- 3, हॉटेल सुरु ठेवणारे- 3, पान टपरीचे मालक-6, इतर दुकाने सुरु ठेवणारे- 53, फेरीवाले- 18, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे- 10 आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. हे देखील वाचा- 'तुमचे असणे आमच्यासाठी गरजेचे आहे' असे ट्विट करत संजय राऊतांनी नागरिकांना दिला भावनिक संदेश
एएनआयचे ट्विट-
राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. जळगावात ठिकठिकाणी कारवाई सुरु आहे. पोलीस आदेश न पाळणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देत आहेत. काहींना उठबशा काढण्याचीही शिक्षा केली जात आहे.