मुंबई: कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामावर गैरहजर राहिलेल्या तब्बल 15 हजार BEST कर्मचाऱ्यांना पगार नाही

मात्र लॉकडाऊनच्या काळात कामावर गैरहजर राहिलेल्या तब्बल 15 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही.

BEST bus (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाऊनचे आदेश सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र लॉकडाऊनच्या काळात कामावर गैरहजर राहिलेल्या तब्बल 15 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही. याबाबत अधिक माहिती देत शनिवारी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या युनियनने असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यांपासून कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आहे. पगारातील एक पैसा सुद्धा हातावर टेकवण्यात आलेला नाही. तसेच कर्मचारी कामावर न आल्यास त्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता.

युनियनचे प्रमुख शशांक राव यांनी असे म्हटले की, हे अमानवीय असून कर्मचाऱ्यांना त्यांचा परिवार आहे. त्यामुळे घरखर्च कसा चालवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पगार कपात करण्याबाबत 100 बेस्ट चालक, कंन्टंक्टर्स आणि विद्युत पुरवठा विभागातील 700 कर्मचाऱ्यांनी 15 ते दोन महिन्यात किती वेळा सु्ट्ट्या मारल्या आहेत त्याबाबत एक चार्जशिट पाठवण्यात आली. परंतु कामगारांना गैरहजर राहिल्यास त्यांच्या वेतनात कपात करण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.(Mumbai Local Trains Update: मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन पुन्हा सुरु होणार? मध्य रेल्वे तर्फे देण्यात आले 'हे' स्पष्टीकरण)

सरकारने अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची सेवा सुरु करण्यास सांगितले. त्याचसोबत नागरिकांना क्वारंटाइन सेंटर पर्यंत पोहचण्यास मदत करणे, स्थलांतरितांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडणे अशी कामे बेस्ट कर्मचाऱ्यांवर सोपण्यात आली आहेत. बेस्ट कर्मचारी हे फ्रंटलाईन कर्मचारी असून त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढला नाही पाहिजे असे ही बेस्टच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

एका उच्च स्तरीय अधिकाऱ्याने आरोप करत असे म्हटले आहे की, काही कर्मचारी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या क्वारर्ट्स मध्ये राहतात. तरीही त्यांनी कामावर दांडी मारली आहे. मात्र अन्य काही कामगार जीव धोक्यात घालून आपले काम पार पाडताना दिसून येत आहेत. त्यामुळे दांडी मारत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कोणतेच स्पष्टीकरण ऐकून घेतले जाणार नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.