Mumbai Accident News: युपीली मजूराचा रस्ता ओलांडताना अघतात मृत्यू, मद्यधुंद टॅक्सीचालकाला अटक

उत्तर प्रदेशातून नुकतेच कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेल्या एका ३१ वर्षीय मजुराचा गुरुवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला.

Accident (PC - File Photo)

उत्तर प्रदेशातून नुकतेच कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेल्या एका ३१ वर्षीय मजुराचा गुरुवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. पीडित तरुणी कॉटन ग्रीन येथून शिवडीकडे जात असताना एका मद्यधुंद टॅक्सी चालकाने त्याच्यावर जोरदार धडक दिली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद नईम शेख असे पीडित तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी असून, तो तीन महिन्यांपूर्वी शहरात आला होता. तो गोवंडी येथे बहीण व भावाकडे राहत होता.

शेख हा जोगेश्वरी येथील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री एकाच्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना अचानक टॅक्सी आणि टेम्पोची धडक झाली. या घटनेत नईम शेखला टॅक्सीची जोरदार धडक लागली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पाहण्यासाठी लगेच गर्दी केली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. नईमच्या पायाल आणि डोक्याला गंभीर जखम झाली होती.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चौकशीतून सचिन लांडगे नावाच्या टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार,टॅक्सीवरील नियत्रंण सुटल्यामुळे टेम्पो आणि टॅक्सीची धडक झाली.रस्त्यावर चालत असलेले नईम याला टॅक्सीची जोरदार धडक लागली आणि त्याला गंभीर जखमा झाल्या. चालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.