Mumbai Rape Case: बलात्कार प्रकरणी डॉक्टराला अटक, दोन गुन्हे दाखल, मालवणीतील घटना
डॉक्टरला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Mumbai Rape Case: मालवणी येथील एका डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. योगेश भानुशाली असं या डॉक्टराचे नाव आहे. डॉक्टरला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. एक 27 सप्टेंबर रोजी आणि दुसरा 3 ऑक्टोबर रोजी असे दोन तक्रारी दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या कडून पैसे लुटायचा. या प्रकरणात एका तरुणीनी त्याच्या विरुध्दात तक्रार दाखल केली.
एका पीडिताच्या वकिलांनी सांगितले की, भानुशाली यांनी वेगळ्या पद्धतीचे अनुसरण केले. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक केली. त्याने त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. त्यांना वरच्या मजल्यावर त्याच्या वैयक्तिक निवासस्थानात नेण्यापूर्वी तळमजल्यावर राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाशी त्यांची ओळख करून दिली. आरोपी तरुणीसोबत शारिरिीक संबंध ठेवायण्यासाठी पटवून देत होता. प्रायवेट जागेवर टॅटू काढण्यासाठी तरुणीला जबरदस्ती केली. शारिरीक संबंध ठेवल्यानंतर पहिल्या महिलेसोबत बोलणं बंद करायचा. तीच्याकडून पैसे आणि दागिने लुटायचा. नाही दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. दुसऱ्या महिलेसोबत देखील असचं केले.
२९ सप्टेंबरला डॉक्टराला या प्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. दुसऱ्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीने दोघींना लग्नाचे आमिष दाखवून लुटलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला.. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच आला आहे.