Mumbai News: लिफ्टमनने 10 वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार, ताडदेवातील घटना

मुंबईतील ताडदेव परिसरात राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीवर तिच्या इमारतीतील लिफ्टमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर येत आहे.

Mumbai News: लिफ्टमनने 10 वर्षाच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार, ताडदेवातील घटना
Abuse | File Image

Mumbai News: मुंबईतील ताडदेव परिसरात राहणाऱ्या एका 10 वर्षीय मुलीवर तिच्या इमारतीतील लिफ्टमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर येत आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तपास घेत आरोपीला अटक केले आहे.पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे. त्यानुसार, फुटेज हाती घेतले आहे.  आरोपीवर या आधी कोणाताही गुन्हा नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा- सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकावर माया-लेकी तुटून पडल्या

मिळालेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी ९.३० ते ९.४५ दरम्यान हा गुन्हा घडला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पीडत मुलगी दुसऱ्या विंगमध्ये जात होती. ती डी विंग मध्ये राहत होती. तीला वरच्या मजल्यावर जायचे होते. लिफ्ट घेतली आत असलेला लिफ्टमनने तिला स्पर्श केला. ती ओरडू लागली तेव्हा तीच्या मानेवर त्याने चुंबनही घेतले. पीडित मुलगी संपुर्ण घाबरून गेली होती. संध्याकाळी ही घटना तीने आई वडिलांना सांगितली.

आई वडिलांनी आरोपीला झोडपले, त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. लल्लो पासवान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी पुरावे सर्व ताब्यात घेतले आहे. आरोपपत्रासह न्यायालयात पूरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 07:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).