Mumbai News: इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, घाटकोपर येथे खळबळ
मुंबईत एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai News: मुंबईत एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणीचा एका 26 वर्षीय व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशंय कुटंबियांनी घेतला आणि याच कारणावरून तीला कुटुंबीयांनी फटकारलं, या गोष्टीचा राग मनात धरत तरुणीने इमारीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे अशी चर्चा परिसरात चालू आहे. ही घटना घाटकोपर येथे 23 जानेवारी रोजी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- तरुणाचा मृतदेह सापडल्याने ठाण्यात खळबळ, मित्राला घेतले ताब्यात)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आईने मुलीच्या प्रियकरावर आरोप केला आहे की, प्रियकराने आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याने तीनं टोकाचे पाऊल उचलले आहे. मुलगी आई वडिल आणि भावासोबत घाटकोपर येथील कामराज नगर येथे राहायची. काही दिवसांपूर्वी तिच्या भावाने रत्यात तिला आणि तिच्या प्रियकरासोबत दिसली. या घटनेनंतर भावाने भर रस्त्यात दोघांनाही सुनावले. दोघांनाही भेटण्यास मनाई केली.
या घटनेनंतर भावाने ही गोष्ट घरात सांगितली. घरातल्यानी देखील मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांना अपघाती मृत्यू झाल्याचा संशय आला त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मुलीच्या आईने मुलीचा प्रियकर शुभम खरात यांच्या नावावर तक्रार दाखल केली. मृत मुलीच्या आईने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, शुभम हा अनेक मुलीच्या प्रेमात आहे. माझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. शुभमने मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे. पोलिस ठाण्यात शुभम विरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी आणि तपास सुरु आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आले नाही.