Mumbai News: मार्वे समुद्रात 5 मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तिघांचा शोध सुरु

मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. या मुलांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईच्या (Mumbai) मार्वे समुद्रकिनाऱ्यावर (Marve Beach) फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे. आज सकाळच्या सुमारास मार्वे गावातील 5 मुले समुद्र किनाऱ्यावर गेली होती, त्यातील एक बुडत असताना त्याला चौघे जण वाचवायला गेले. या डुबणाऱ्या पाच जणांपैकी दोघांना वाचवण्यात कोळी बांधवाना यश आले आहे. मात्र उर्वरित तिघांचा शोध हा सध्या सुरु आहे.  (हेही वाचा - Maharashtra Weather Update: पुढील चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्याता, विदर्भात यलो अलर्ट)

मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. या मुलांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.कृष्णा जितेंद्र हरिजन (सोळा वर्षे ) आणि अंकुश भारत शिवरे (तेरा वर्ष ) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे.

यावेळी तीन मुले बेपत्ता झाली असून त्यांची नावे शुभम राजकुमार जयस्वाल (बारा वर्ष), निखिल साजिद कायमकूर (तेरा वर्ष ), अजय जितेंद्र हरिजन (बारा वर्ष) अशी आहेत. कोस्टगार्डचे जवान अग्निशमन दलाचे जवान महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे जवान समुद्रात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement