IPL Auction 2025 Live

मुंबई: गोरगावमधील नेस्को प्रदर्शन केंद्राचे क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर; सुविधांची पाहणी करण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून कोविड19 केंद्र आणि क्वारंटाईन सेंटरची उभारणी केली जात आहे. यातच गोरेगाव (Goregaon) येथे असलेले नस्को प्रदर्शन केंद्राचे (Nesco Exhibition Centre) क्वारंटाईन सेंटरमध्ये (Quarantine Centre) रुपांतर करण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या ठिकाणी जाऊन येथील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली आहे. तसेच राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहून चिंता देखील व्यक्त केली आहे. तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही कौतूक केले आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मुंबई एका दिवसाला 1500 च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे अनेक रुग्णालयात खाटांची कमरतता जाणवत आहे . तसेच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. यामुळे राज्य सरकार लवकरात लवकर नागरिकांची गैरसोयीपासून सुटका करेल, अशी आशा देवेंद्र फडणवीस व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद; तर, 40 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

मुंबईत कोरोना प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढू लागला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोरेगाव, महालक्ष्मी , मुलुंड , दहिसर , भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम जोरात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत येत्या आठवडाभरात सुमारे 8 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.