Nalasopara Teacher Slaps Student: शिक्षिकेने थप्पड मारल्याने 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी; मेंदुला दुखापत, बहिरेपणाही आला; नालासोपारा येथील घटना

पीडितेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून, तिला बहिरेपणही आले आहे. सध्या तिच्यावर के. जे. सोमैया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Girl Student | (File Image

मुंबईतील नालासोपारा (Nalasopara) येथील शिकवणी शिक्षिकेने थप्पड (Teacher Slaps Student) मारल्याने 10 वर्षांची एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून तिला बहिरेपणही आले आहे. दीपिका पटेल, असे या मुलीचे नाव आहे. तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिस आयसीयूमध्ये भरती केले. सध्या तिच्यावर सायन येथील के. जे. सोमैया (Kj Somaiya Hospital) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (Student On Ventilator) आहे. शिक्षीकेने मारहाण केल्याची घटना पीडितोसोबत पाठिमागच्या आठ दिवसांपूर्वी घडली आहे

घटनेचा तपशील

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसाह, ही घटना नालासोपारा येथे 5 ऑक्टोबर 2024 रोजी घडली. मुलीने वर्गामध्ये गैरवर्तन केल्याबद्दल शिक्षिका रत्ना सिंग (20) यांनी दीपिकाला कानाखाली थप्पड मारली. या थप्पडामुळे तिच्या उजव्या कानात संसर्ग झाला, ज्यामुळे नंतर तिची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली. पुढे हा त्रासवाढतच गेला आता तिला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी तुळिंज पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. या घटेमुळे स्थानिक शैक्षणीक वर्तुळातही खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, Nandurbar: अल्पवयीन मुलीस मबाईलवर दाखवला Pornographic Content, नंदूरबार येथील धक्कादायक प्रकार, एकास अटक)

शिक्षिकेकडून शिक्षेचे समर्थन, पालकांचा आरोप

इतर विद्यार्थ्यांना त्रास दिल्याबद्दल शिक्षिकेने दीपिकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. आपल्या मुलीची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर दीपिकाच्या आईने शिकवणी केंद्राला भेट दिली, परंतु शिक्षिकेने दावा केला की तिच्या वर्गातील वागणुकीमुळे ही शिक्षा न्याय्य होती. (हेही वाचा, Mobile Phones Ban In School: शालेय आवारात मोबाईल बंदी)

वैद्यकीय खर्चापोटी प्रतिदिन 25 हजार रुपयांचा खर्च

प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीस दीपिका हिला उपचारासाठी तुळींज येथील बालाजी क्लिनिकमध्ये नेण्यात आले, जिथे तिला औषधे लिहून देण्यात आली. मात्र, तिच्या कानाजवळ अधिक सूज आल्याने तिची प्रकृती खालावली. काही दिवसांनंतर, ती आता खाऊ शकत नव्हती किंवा तोंड उघडू शकत नव्हती, ज्यामुळे तिच्या कुटुंबाला तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले. आयसीयू बेड नसल्यामुळे तिला के. जे. सोमैया रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तिचा दैनंदिन उपचार खर्च आता दररोज ₹25,000 पर्यंत पोहोचला आहे, जो भार कुटुंबाला सहन करावा लागत आहे.

वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध बाल न्याय कायदा आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका सामाजिक संघटनेच्या पाठिंब्याने हे कुटुंब केवळ शिक्षिकेविरुद्धच नव्हे तर शिकवणी केंद्रावरही कारवाई करण्याची मागणी करत आहे. आम्हाला न्याय मिळावा दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडितेच्या पालकांनी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif