Break The Chain: मुंबई महापालिकेकडून धार्मिक स्थळांसाठी नियमावली जाहीर, भाविकांना 'या' नियमांचे करावे लागणार पालन

ज्यामुळे राज्यातील विविध भागात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

temple (wikipedia)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील विविध भागात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळे (Religious Places) पुन्हा उघडण्याच्या मागणींनेही जोर धरला होता. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी लक्षात मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा महापालिकेने दिला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतील सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या ही त्या धार्मिक स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. शासनाने वेळोवळी जाहीर केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Mumbai Schools Reopen: मुंबईत शाळा पुन्हा उघडण्याची तयारी सुरू, काय असतील नियम? घ्या जाणून

दरम्यान, राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत 24 सप्टेंबर रोजी एक आदेश जारी केला होता. ज्यात राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.यासोबतच नियमावली जारी करण्यात आल्या असून हे सर्व नियम मुंबई पालिका क्षेत्रात 7 ऑक्टोबरपासून लागू असणार आहेत.