Mumbai Monsoon 2020: मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या 6 दिवसातच बरसला महिन्याभराचा अपेक्षित 60% पाऊस
मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र सोमवारी (6 जुलै) संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईत जवळपास 506.4 mm इतका पाऊस नोंदविण्यात आला. हा पाऊस जुलै महिन्यातील 60% पावसाइतका आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना (Mumbaikar) या पावसामुळे आल्हाददायक गारवा मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या महिन्यातील अपेक्षित पाऊस पडला आहे. यात पहिल्या 6 दिवसात 60% पाऊस झाला आहे. रविवारी मुंबईत (Mumbai) मागील पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेकिंग पावसाची नोंद झाली होती. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पासून मागेल काही दिवस कायम आहे. 506.4mm इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र सोमवारी (6 जुलै) संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईत जवळपास 506.4 mm इतका पाऊस नोंदविण्यात आला. हा पाऊस जुलै महिन्यातील 60% पावसाइतका आहे. Mumbai Rains Today: मुंबई व लगतच्या भागात आज अधून मधून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ, पुणे शहरात अद्याप जोरदार असा पाऊस झालेला नाही मात्र पावसाची सद्य स्थिती सुद्धा समाधानकारक आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज, मंगळवार 7 जुलै रोजी मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे (Thane), रायगड (Raigad), नवी मुंबई (Navi Mumbai) येथे अधून मधून पावसाच्या सरी बरसतील. आज पाऊस सलग राहणार नाही पण कोसळायला लागला की मध्यम ते जोरदार स्वरूपात असेल. पुढील 24 तासांसाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तसेच उपनगरीय भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील.
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2020 11:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

