IPL Auction 2025 Live

Mumbai Metro: मुंबई मेट्रो लाईन 2B वरील Kurla Terminus व MMRDA Station रद्द; जाणून घ्या कारण

मेट्रो विकास एजन्सी, एमएमआरडीएने (MMRDA) व्यवहार्यतेचे पुनर्मूल्यांकन केल्यावर, वांद्रे-कुर्ला संकुलातील कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन (Kurla Terminus Metro Station)

Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) डीएन नगर-बीकेसी-मंडाले मार्गावर येणारी दोन मेट्रो स्थानके (Metro Stations) रद्द केली गेली आहेत. मेट्रो विकास एजन्सी, एमएमआरडीएने (MMRDA) व्यवहार्यतेचे पुनर्मूल्यांकन केल्यावर, वांद्रे-कुर्ला संकुलातील कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन (Kurla Terminus Metro Station) आणि एमएमआरडीए स्टेशन (MMRDA Station) रद्द  करण्याचा निर्णय घेतला. या मेट्रो मार्गावर (Line 2B) जिथे आधी 22 स्थानके असणार होती, आता 20 स्थानके असतील. यापैकी कुर्ला टर्मिनस एक महत्वाचे स्थानक होते, जे डीपीआर आणि मेट्रो 2 बीच्या निविदेत प्रस्तावित होते परंतु आता हे स्टेशन काढले जात आहे.

हा निर्णय घेताना नेमक्या कोणत्या बाबी विचारात घेतल्या याचे स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएचे प्रमुख आरए राजीव म्हणाले की, बीकेसी रोडच्या जंक्शनवर एमएमआरडीए मेट्रो स्टेशनची योजना होती, मात्र त्यासाठी कलानगर उड्डाणपुलाचा उतार मधे येत होता. एमएमआरडीएने एमएमआरडीए स्टेशन आणखी पूर्वेकडे हलविण्याची योजना आखली होती, परंतु त्यामुळे आयकर कार्यालय जंक्शनला समस्या उद्भवल्या असत्या. (हेही वाचा: मुंबई, ठाणे, पुण्याबद्दल काहीही बोलाल तर खबरदार! राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेत इशारा (पाहा व्हिडिओ))

कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन, पश्चिमेकडील मध्य रेल्वे मार्गाच्या जवळच नियोजित होते. परंतु कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन आणि कुर्ला रेल्वे स्थानक हे अंतर केवळ अर्धा किलोमीटरचे असल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले. इथल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहित आदर्श अंतर हे 1 किमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे 500 मीटर अंतर जाण्यासाठी लोक चालत जाऊ शकतात, म्हणूनच इथे नवीन स्टेशन उभारण्याची गरज नसल्याचे विचार घेण्यात आले. कुर्ला येथील विमानतळ क्षेत्राभोवती उंची निर्बंधाचाही राजीव यांनी उल्लेख केला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, ज्यांनी हा विषय उचलून धरला, ते म्हणाले, ‘एमएमआरडीएने कुर्ला (पश्चिम) मधील पर्यायी जागेचा विचार करायला हवा होता. रहिवाशांच्या सूचना न मागता हा निर्णय घेण्यात आला आहे.’ अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो लाइन 2 बी पश्चिम आणि पूर्व उपनगरास जोडते आणि कुर्ला स्टेशन महत्वाचे आहे.