Mumbai Mega Block on August 30: केवळ ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल लोकलवर होणार परिणाम
ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कालावधीत आपल्या प्रवासाचे आधीच नियोजन करण्याचा तसेच उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या मुंबई लोकल मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) वेळापत्रकानुसार, 30 ऑगस्ट रोजी मध्य मार्गावरील उपनगरीय सेवा, हार्बर मार्ग, उरण मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. त्यामुळे या मार्गांवरील लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील. पण ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे ठाणे ते वाशी, नेरूळ आणि पनवेल दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम होणार असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Central Railway 15-Day Special Block: टिटवाळा स्थानकावर फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकल सेवांवर होणार परिणाम.
30 ऑगस्टच्या मेगाब्लॉकची वेळ आणि परिणाम
ठाणे ते वाशी/नेरूळ या अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या कालावधीत राबवला जाणार आहे. या वेळेत ठाणे, वाशी, नेरूळ आणि पनवेल स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन दोन्ही दिशांच्या ट्रान्स हार्बर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील.
रद्द होणाऱ्या सेवांचा तपशील
ठाणे स्थानकावरून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर सेवा रद्द राहतील. त्याचप्रमाणे, पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई लोकल मेगा ब्लॉक
ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कालावधीत आपल्या प्रवासाचे आधीच नियोजन करण्याचा तसेच उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मेन लाईन वर विद्याविहार- ठाणे दरम्यान ब्लॉक
विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यानच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या लोकल मार्गावर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या कालावधीत राबवला जाणार आहे. या वेळेत संबंधित मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
मेगाब्लॉकच्या कालावधीत विद्याविहार आणि ठाणे दरम्यान धीम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळापत्रकातील बदलांना सामोरे जावे लागणार आहे. या मार्गावरील काही लोकल सेवा रद्द होण्याची किंवा उशिराने धावण्याची शक्यता असून, जलद मार्गावरील सेवांवर आणि वेळापत्रकावरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.