Mumbai Mega Block: मुंबईकरांनो घराबाहेर पडताना वेळ पाहा; लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर पाच तास मेगाब्लॉक, काही एक्सप्रेस टेनही रद्द

रेल्वेने लोकलच्या आज (30 जानेवारी) मध्य आणि हार्बर मार्गावर तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेतला आहे.

Mumbai Local | (Photo Credit: ANI)

मुंबईकर नागरिकांनो तुम्ही जर आज दिवसभरात काही कामानिमित्त घराबाहेर पडायचा विचार करत असाल तर आगोदर घड्याळ पाहा. रेल्वेने लोकलच्या आज (30 जानेवारी) मध्य आणि हार्बर मार्गावर तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेतला आहे. हा मेगाब्लॉक प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान बेलापूर खारकोपर दरम्यानची रेल्वेसेवा मात्र सुरु राहणार आहे. मेगाब्लॉकचा फटका काही एक्सप्रेस ट्रेन्सनाही बसला आहे. सीएसएमटीवरुन कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 असा पाच तासांचा मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेन. या कालावधीत वहतूकसेवा विस्कळीत होण्याची शक्यता विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्याचे अवाहन केले आहे. (हेही वाचा, Gandhidham Express Fire: गांधीधाम पुरी एक्सप्रेसला लागलेली आग आटोक्यात, धावपळ आणि आरडाओरडा पाहून प्रवासी घाबरले)

ट्विट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या कालावधीत मेगाब्लॉक असेन. तर, पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत अशा एकूण पाच तासांचा मेगाब्लॉक असेन. दरम्यन, बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय ट्रेन वेळापत्रकानुसार नियोजित वेळापत्रकानुसार धावतील असे रेल्वेने म्हटले आहे. याशिवाय नेरुळ-खारकोपर सेवा रद्द करण्यात आल्याचेही रेल्वेने म्हटले आहे.