मुंबई: Covishield लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
तत्पूर्वी त्याने कोरोनावरील लस कोविशिल्ड (Covishield) याचा दुसरा डोस घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे.
Mumbai: एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला असलेल्या सायन रुग्णालयातील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तत्पूर्वी त्याने कोरोनावरील लस कोविशिल्ड (Covishield) याचा दुसरा डोस घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. मुलाला हे दोन्ही डोस रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीनंतर दिले गेले होते असे तेथील डॉक्टरांनी म्हटले आहे.(Coronavirus: कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाइनच्या नियमांचे 52 वर्षीय व्यक्तीकडून भंग, भिवंडी पोलीसात महापालिकेकडून FIR दाखल)
गेल्याच आठवड्यात 21 वर्षीय मुलाने कोविशिल्डची लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्याला संसर्गजन्य आजाराची लक्षण दिसून आल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात शनिवारी रात्री उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या हॉस्टेलमधील काही जणांना क्वारंटाइन करण्यात आले.
सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बालकृष्ण अडसुळे यांनी असे म्हटले की, कोरोनाची लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ठराविक काळात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल असे नाही. तर मुलामध्ये सौम्य लक्षण दिसून आली होती आणि त्याची प्रकृती ठिक होती. पण कोरोनाची एकदा लस घेतल्यानंतर 45 दिवसांपर्यंत शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास कालावधी लागतो. त्याच दरम्यान मुलाला जेव्हा दुसरा डोस दिला गेला त्यावेळी त्याला संसर्ग झाल्याचे दिसून आले.(महाराष्ट्राला लॉकडाऊनचा फटका, पैसे नसल्याने 96 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाल्याचा रिपोट्स मधून खुलासा)
दरम्यान, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. तर राज्य सरकार वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे कठोर पावले उचलत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा सुद्धा केली आहे. महापालिकेला सुद्धा कठोर निर्देशन दिले गेले आहेत. सरकारने मुंबईकरांना कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवता वागलात तर लॉकडाऊनची गरज भासेल असा इशारा दिला आहे.