अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 11 जण हाजीर होSS; पोलिसांची नोटीस
या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पोलिसांकडून यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. त्याबाबतची पत्रं घेण्यासाठी या नेत्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil), अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरे (Sunil Tatkare), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), सचिन अहिर, अशोक धात्रक, सुनील तटकरे, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुभेदार या नेत्यांना उद्या मुंबई येथील शिवडी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. जमावबंदी आदेश असताना या नेत्यांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले होते. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पोलिसांकडून यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. त्याबाबतची पत्रं घेण्यासाठी या नेत्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सचिन अहिर, अशोक धात्रक, सुनील तटकरे, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुभेदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 ते 25 नेत्यांनी 2018 मध्ये मंत्रालयात परिसरात आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदी आदेश असतानाही या ठिकाणी या नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर न्यायालयीन प्रक्रियेनुसार दोषारोप दाखल करणे आवश्यक असते. त्यानुसार या प्रकरणाची शिवडी न्यायालयात सुनावणी होत आहे. या सुनावणीस हजर राहण्याबाबत आणि दोषारोप पत्र घेण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यातर्फे या नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.