Mumbai Marathon 2020: महिलांच्या अर्धमॅरेथॉन मध्ये मराठमोळ्या धावपटूंनी मारली बाजी, इथिओपिआचा धावपटू डेरारा हरीसा ठरला एलिट मॅरेथॉनचा विजेता

आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेली मुंबई 17 व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली. हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा मराठी धावपटूनि ठसा उमटवला. हाफ मॅरेथॉन कोल्हापुरची आरती पाटील दुसऱ्या स्थानावर राहिली. पुरुष गटामध्ये हैदराबादचा तीर्थ याने पहिला क्रमांक पटकावला.

मुंबई मॅरेथॉन 2020 विजेता (Photo Credit: Yogen Shah)

आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळालेली मुंबई 17 व्या टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) स्पर्धा आज पार पडली. टाटा मुंबई मॅरेथॉन शर्यतीत आज तब्बल 46000 धावपटूंनी भाग घेतला. गीतकार गुलजार, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेता राहुल बोस यांनी धावपटूंना चालना देण्यासाठी भाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये डॉक्टरही धावताना दिसले. या काडकाच्या थंडीत मुंबई मॅरेथॉनला भल्यापहाटे सुरुवात झाली. मुंबईच्या गुलाबी थंडीत धावपटूंचा उत्साह पाहण्यासारखा होता. फुल मॅरेथॉनला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिस येथून हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मुंबई मॅरेथॉनमधील एलिट स्पर्धेत परदेशीं खेळाडूंमध्ये केनियाच्या हुरीसा (Derara Hurisa) याने सर्वप्रथम रेस पूर्ण केली. भारतीय खेळाडूंमध्ये श्रीनु याने बाजी मारली. हाफ मॅरेथॉन महिलांमध्ये उत्तर प्रदेशची पारुल चौधरी (Parul Chaudhary) पहिल्या, तर कोल्हापुरची आरती पाटील (Aarti Patil) दुसऱ्या स्थानावर राहिली. पुरुष गटामध्ये हैदराबादचा तीर्थ याने पहिला क्रमांक पटकावला. (मुंबई मॅरेथॉनला गालबोट! 64 वर्षीय वृद्ध गजानन माळजलकर यांचा कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू)

हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा मराठी धावपटूनि ठसा उमटवला. मॅरेथॉनमध्ये पुरुष संघाचे नेतृत्व बुगाथा आणि महिला संघाचे नेतृत्व सुधा सिंग करीत होते. दरम्यान, यंदाच्या स्पर्धेतील एलिट शर्यतीत विजयी होत इथिओपिआचा धावपटू डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत नवा रेकॉर्ड नोंदविला.

दुसरीकडे, टाटा मुंबई मॅरेथॉन दरम्यान आज सकाळी 64 वर्षांच्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  गजानान मार्लेकर असं या स्पर्धकाचे नाव आहे. त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मार्लेकर यांच्याबरोबर आणखी दोनजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 40 वर्षीय हिमांशु ठक्कर अस या स्पर्धकाचं नाव आहे. मुंबई मॅरेथॉनच्या 17 व्या आवृत्तीदरम्यान अनेक मुद्दे उपस्थित झाले. यामध्ये डॉक्टरांवरील हिंसाचाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. यावेळी, एक डॉक्टर पीडित दिसला ज्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबाच्या हल्ल्यांपासून संरक्षणाची मागणी केली. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनेही(एम्स) डॉक्टरांशी हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर केंद्रीय कायदे करण्याची मागणी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now