धक्कादायक! बायको-मुलीचा गळा दाबून मृतदेह पेटवले, पती-प्रेयसीचा संतापजनक प्रकार

मुंबई पोलिसांनी एका प्रेयसी आणि व्यक्तीला बायको आणि मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबई पोलिसांनी एका प्रेयसी आणि व्यक्तीला बायको आणि मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर पोलिसांना आरोपीच्या घरात बायको मुलीचा जाळलेला मृतदेह आढळून आला आहे.

इलयास सय्यद असे आरोपीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी इलयास आणि बायको तहसिन या दोघांचा विवाह झाला होता. तसेच या दोघांना दोन लहान मुली आहेत. गुरुवारी सकाळी इलयास याने बायको आणि लहान मुलगीचा गळा आवळला. त्यानंतर इलयास घरातून निघुन गेला. मात्र प्रेयसी आफ्रिन ही बुरखा, ग्लोज आणि चेहऱ्यावर मास्क घालून न कळत सय्यद राहत असलेल्या घरात शिरली. त्यानंतर सय्यदने हत्या केलेल्या बायको-मुलीला जाळण्यासाठी घरातील तेल आणून त्यांच्यावर प्रथम टाकून जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

रविंद्र शिसवे उपायुक्त पोलीस अधिकारी यांनी असे सांगितले की, इलयास आणि आफ्रिनमध्ये सातत्याने भांडणे व्हायची. मात्र या भांडणासाठी प्रेयसी आफ्रिन ही कारणीभूत असायची. तसेच पोलिसांनी पुढे सांगत असे म्हटले की, क्रूरपणे हत्या केल्यानंतर तिने खराब झालेल्या मोबाईलवरुन पोलिसांना आत्महत्या झाली असल्याची बातमी दिली. या प्रकरणी आरोपी आफ्रिन हिने तेथून पळ काढण्यासाठी इमारतीच्या पायऱ्यांचा आधार घेत दुसऱ्या इमारतीत निघुन गेली. तसेच आफ्रिन हिने घातलेला बुरखा फाईव्ह गार्डन येथे घरी आल्यानंतर फेकून दिला.

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूच्या परिसारातील घडणाऱ्या घटना पाहिल्या. त्यावेळी पोलिसांना सकाळी 10.30 दरम्यान टॅक्सीमधून बुरखा घालून आलेली महिली दिसली आणि 11.30 वाजता तिच महिला इमारतीतून संयशास्पद निघुन गेल्याचे दिसले. या प्रकरणी टॅक्सी चालकाने पोलिसांची मदत केली असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement