‘Farzi’ वेब सीरीज मधून प्रेरणा घेत मुंबईत लोकप्रिय दांडियाचे बनावट पास बनवले; 30 लाख कमावण्याचा प्लॅन करणारे 3 जण अटकेत
बोरिवली मध्ये होणार्या Durgadevi Navratra Utsav Samiti चे बनावट पास छापून 30 लाख कमावण्याचा मुंबईतील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
शाहिद कपूरच्या फर्जी (Farzi) या वेब सिरीज मधून प्रेरणा घेत एका मुंबईच्या ग्राफिक डिझायरने बोरिवली मधील प्रसिद्ध दांडिया प्रोगामचे पास बनवले. 1000 बनावट पास बनवून तो 30 लाख कमावण्याच्या विचारात होता. पण पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावत त्याला अटक केली आहे. त्याच्या 3 साथीदारांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अजूनही 2 जण फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी बनावट पास आणि ते बनवण्यासाठी वापरलेली काही साधनसामुग्री देखील जप्त केली आहे. MHB Colony police कडून कारवाई करताना त्यांना करण शाह व त्याचे साथीदार दर्शन गोहिल, परेश नेवरेकर,कविश पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत. शाह याने बोरिवली मध्ये होणार्या Durgadevi Navratra Utsav Samiti चे बनावट पास छापले. या नवरात्रीचे खरे पास 3 हजार ते 3800 रूपयांना विकले जातात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट पास 2600 रूपयांना विकले गेले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शाहने आपण शाहिद कपूरच्या वेब सिरीज मधून प्रेरणा घेत झटपट पैसे कमावण्याकरिता बनावट पास छापल्याची कबुली दिली. वेब सीरिज मध्ये शाहीद ज्या भूमिकेत आहे त्यामध्ये तो आर्टिस्ट असून खोट्या नोटा छापतो. Marathi Dandiya 2023: भाजपाकडून मुंबई मध्ये 300 पेक्षा अधिक ठिकाणी दांडिया, गरबा आणि भोंडला याचं आयोजन; अवधूत गुप्ते, फाल्गुनी पाठक, गीता रबारी ठरणार आकर्षण .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली (पश्चिम) येथील कच्छी ग्राउंड, न्यू लिंक रोड येथील आयोजकांच्या अधिकृत स्टॉलवरून कार्यक्रमाचे मूळ पासेस विकले जात होते. शनिवारी, चार ते पाच तरुण स्टॉलवर आले आणि त्यांनी प्रतिनिधींना सांगितले की त्यांनी कार्यक्रमासाठी काही पास खरेदी केले आहेत आणि ते खरे आहेत की नाही हे तपासण्याची इच्छा आहे. कार्यक्रम प्रतिनिधींनी पास तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले.
एफआयआरनुसार पासेसवर छापलेले अनुक्रमांक अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. त्यानंतर या तरुणांनी दर्शन गोहिल यांच्याकडून पासेस खरेदी केल्याचे प्रतिनिधींना समजले.
कार्यक्रमाच्या आयोजकाने शनिवारी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात जाऊन फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप करत तक्रार दाखल केली. फसवणूक खूप मोठी असू शकते आणि फसवणुकीच्या आणखी घटना टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी डीसीपी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय डॉ दीपक हिंदे, मंगेश किरपेकर मुकेश खरात आणि इतरांचा समावेश असलेले पोलीस पथक तयार केले. त्यांनी मुख्य सूत्रधार करण शहासह चार जणांना अटक केली.
या टोळीकडून एकूण 1,000 पास जप्त करण्यात आले असून, त्यांनी सुमारे 30 लाख रुपये कमावण्याची योजना आखली होती, असे पोलिसांनी सांगितले. इव्हेंट जवळ आल्यावर त्यांनी पासच्या किमतीही वाढवल्या. अधिकाऱ्यांनी सुमारे 35.10 लाख रुपये किमतीचे 1,000 होलोग्राम, छपाई उपकरणे, लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.