Mumbai: वडिलांचा राग करत असल्याने व्यक्तीकडून चिमुकलीची हत्या
लहान बाळाचा मृत्यू (File Image)

Mumbai: गोरेगाव पश्चिमेला राहणाऱ्या एका 10 महिन्याच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी राजू रावत याला अटक करण्यात आली आहे. राजू रावत हा चिमुकल्या मुलीचे वडिल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Dombivli Gangrape Case: डोंबिवली सामूहिक बलात्कारप्रकरणी रामदास आठवले यांचे खळबळजनक विधान)

पीडिता आरो रोड येथील रावत यांच्या परिवारासोबत राहत होती. पोलिसांनी असे म्हटले की, रावत याने शुक्रवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर मुलीला पळवून नेले. जेव्हा घरातील मंडळींना कळले ती बेपत्ता आहे तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मुलीचा तपास सुरु केला असता तिचा मृतदेह झाडाझुडपात पडलेला आढळून आला. मुलीच्या मृत्यूप्रकरणी लैंगिक अत्याचार केल्याचे तपासून पाहण्यासाठी फॉरेन्सिक टीमने नकार दिल्याचे पोलिसांनी म्हटले.(Mumbai Rape Case: राजकोटमधील पुजाऱ्याचा मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार, तिघांना अटक)

रावत याने घरातल्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने मुलीला पळवले आणि रागातून हत्या केली. रावत याच्याबद्दल पोलिसांना कळले असता त्यांनी त्याला अटक केली. त्याच्या विरोधात आयपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एका रेस्टॉरंटमध्ये डिश साफ करण्याचे काम करतो.