मुंबई मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार, तरुणाची प्रकृती गंभीर

मुंबईतील मानखुर्द परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून अब्बास शेख या 30 वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. सध्या पीडित तरुणाची प्रकृती गंभीर असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.

मुंबई मध्ये प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार, तरुणाची प्रकृती गंभीर
Representational Image (Photo Credits: File Image)

मुंबई: मानखुर्द (Mankhurd) परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून अब्बास शेख (Abbas Shaikh)  या 30 वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये अब्बास हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना मानखुर्द मधील झाकीर हुसेन नगर मध्ये घडली. पालघर (Palghar)  जिल्ह्यातील मूळ रहिवाशी अब्बास हा सकाळी मानखुर्द येथे आपल्या मित्राच्या घरी आला होता.याची खबर मिळताच अब्बासच्या अन्य दोन मित्रांनी मानखुर्द येथील मित्राच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळीबार केला. दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक तपासाच्या आधरे संशयित गुन्हेगार व अबास यांच्यामध्ये रायगड येथील एका  प्रॉपर्टीवरून काही दिवसांपासून वाद सुरु होते. आज पहाटे अब्बास मानखुर्द येथे आल्याची माहिती कळताच या दोन मारेकऱ्यांनी अब्बासच्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभजीर जखमी झालेल्या अब्बासला त्याच्या मित्राने तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याची पप्रकृती अधिक गंभीर झाल्याचे सांगण्यात येतेय. मुंबई: घाटकोपर येथे रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, एकाचा मृत्यू

दरम्यान एका संशयित मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आओपीचा शोध सुरु आहे. या दोघांवर आयपीसी अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांचा सखोल तपास सुरु असून अद्याप मारेकऱ्यांची नावे उघड केलेली नाही.

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2019 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).