Mumbai: ऑनलाईन वाइन मागवणे पडले महागात, खात्यातून 1.5 लाखांची रोकड लंपास

त्यावेळी त्याला ऑनलाईन पद्धतीने वाइन मागवणे चांगलेच महागात पडले असून त्याच्या खात्यातून दीड लाख रुपयांनी रोकड लंपास केली गेली

Mumbai: परदेशातील एका बँकेत काम करणारा व्यक्ती मुंबईत सुट्टीसाठी आला होता. त्यावेळी त्याला ऑनलाईन पद्धतीने वाइन मागवणे चांगलेच महागात पडले असून त्याच्या खात्यातून दीड लाख रुपयांनी रोकड लंपास केली गेली. तर फोनवरील व्यक्तीने पीडित व्यक्तीला तो दारुच्या दुकानातील कर्मचारी असल्याचे सांगत त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय कार्डची माहिती विचारत त्याच्याकडून पैसे उकळले. तर तक्रार केल्यानंतर एका तासाच्या आतमध्येच कार्ड ब्लॉक करण्यात आले.

तक्रारदार हा मलबार हिल्स येथील त्याच्या एका नातेवाईकाकडे राहत होता. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर तुकाराम दिगे यांनी असे म्हटले की, तक्रारदाराने त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये दारु ऑर्डर करण्यासाठी क्रमांक मागितला. तेव्हा त्याच्या एका मित्राने दारुच्या दुकानाचा क्रमांक सर्च करुन त्याला पाठवला असे दिगे यांनी म्हटले.(Satara Crime: तरुणाला बेदम मारहाण करुन उकळत्या चुन्यात ढकलले, सातारा शहरातील घटना)

जेव्हा तक्रारदाराने त्या क्रमांकावर फोन लावला असता त्यावरील व्यक्ती आम्ही घरी वाइन पाठवून देऊ पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागेल असे त्याने म्हटले. त्यानुसार तक्रारदाराने त्याला 5,500 रुपये त्याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पाठवले. तसेच फोनवरील व्यक्तीने वाइनची डिलिव्हरी करण्यासाठी त्याच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स मागत आम्ही आता ती पाठवून देऊ असे म्हटले. त्याचवेळी तक्रारदाराला मोबाईलवर त्याच्या बँक खात्यातून 1.48 लाखांहून अधिक रक्कम काढला गेल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार केली. तक्रारदाराला काही दिवसांनी त्याची रक्कम पुन्हा परत दिली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif