मुंबईत दागिने पॉलिशिंग करुन देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक

दागिने पॉलिश करुन देण्याच्या नावाखाली याच व्यक्तीने जवळजवळ 762 ग्रॅमचे दागिने ज्याची किंमत 32 लाख रुपये आहे ते घेऊन तो फरार झाला होता.

Representational Image (Photo Credit: ANI)

नौपाडा (Naupada) पोलिसांनी धारावी येथून एका व्यक्तीला अटक केली असून तो एका दागिन्यांच्या दुकानात काम करत होता. दागिने पॉलिश करुन देण्याच्या नावाखाली याच व्यक्तीने जवळजवळ 762 ग्रॅमचे दागिने ज्याची किंमत 32 लाख रुपये आहे ते घेऊन तो फरार झाला होता. पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, आरोपी रफिक शेख याला अटक केली असून मुख्य आरोपी राजा शेख याचा अद्याप शोध लागलेला नाही.(Rekha Jare Murder Case: मुख्य सूत्रधार बाळ बोठे ला हैदराबाद मधून 3 महिन्यांनी अटक)

पोलिसांनी पुढे असे म्हटले आहे की, 25 फेब्रुवारीला मुख्य आरोपी राजा शेख याने त्याच्या येथील काही स्थानिकांना दागिने पॉलिश करुन देतो असे म्हटले. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, अमोद चांचड याने त्याच्याकडे पॉलिशिंगसाठी जवळजवळ 32 लाखांचे दागिने दिले. पण पॉलिशिंग करण्याच्या नावाखाली आरोपीने दागिन्यांसह पळ काढला असून अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही.(Pune: लज्जास्पद! पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून फेसबुकवर केला प्रसारीत; पतीविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

या प्रकरणी नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे धारावी मधील आरोपीला अटक केली गेली आहे. सुरुवातीला त्याने मुख्य आरोपीबद्दल सांगण्यास घाबरत होता आणि त्याने धारावीतील आरोपीकडे काही दागिने घेतले होते ते पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 27 लाखांचे दागिने ताब्यात घेतले असून ते 664 ग्रॅमचे आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता नागरिकांना अशा फसव्या माणसांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.