मुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पंकज कुंभार गजाआड; सातारा पोलिसांची मुंबई येथे कारवाई

या धमकीनंतर पोलिसांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करत, धमकी देणाऱ्या पंकज कुंभार (Pankaj Kumbhar) या व्यक्तीचा शोध सुरु केला होता.

(Photo Credit -file photo)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार (Pankaj Kumbhar) नामक व्यक्तीस सातारा पोलिसांनी (Satara police) मुंबई येथून ताब्यात घेतले. कुंभार याने सोशल मीडियाचा गैरवापर करत मुख्यमंत्र्यांच्या हत्येची धमकी दिली होती. त्याने 'अजित दादा काल वाचले. आता 4 फेब्रुवारीला सातारा येथे मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांचा खात्मा होणार', अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, सातारा गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व्ही. जे. कुंभार (VG Kumbhar ) यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंकज कुंभार हा व्यक्ती पुणे (Pune) येथील राहणारा असल्याची प्राथमिक माहती आहे. मुंबई येथील अग्रीपाडा (Agripada) येथून त्याला पोलिसांनी अटक केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Cm Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर पोलिसांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करत, धमकी देणाऱ्या पंकज कुंभार (Pankaj Kumbhar) या व्यक्तीचा शोध सुरु केला होता. पंकज कुंभार या व्यक्तीने फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे पंकज कुंभार नावाच्या व्यक्तिने ही धमकी हिंदीमध्ये दिली होती. तसेच, त्याने स्वत:ला 'अजमल कसाब' असेही संबोधले होते. दरम्यान, पंकज कुंभारने फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. 'अजित दादा काल वाचले. आता 4 फेब्रुवारीला सातारा येते मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांचा खात्मा होणार', असे त्याने फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये लिहिले होते.  (हेही वाचा, मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे मारण्याची छगन भुजबळांना धमकी)

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

पंकज कुंभार नावाच्या व्यक्तिने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी अजमल कसाब, काल अजित दादा वाचले. आता सातारा येथे मुख्यमंत्री ठार होणार. 26/11 सारखे ऑपरेशन आता साताऱ्यात होणार. सीएम आणि 40,000 लोक खतम होणार. 4 फेब्रुवारी 2019, खंडाळा, सातारा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif