कोरोना व्हायरसबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलावली तात्काळ बैठक; कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रातील नेत्यांशी चर्चा सुरु
त्यानंतर भारतातही कोरोना व्हायरसचे पदसाद उमटू लागले आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. त्यानंतर भारतातही कोरोना व्हायरसचे पदसाद उमटू लागले आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. यातच मुंबई (Mumbai) येथील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. यानंतर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाबाबत तात्काळ बैठक बोलावून कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रातील नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. महत्वाचे म्हणजे या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येणार आहेत, याबाबत सर्वांनाच उस्तुकता लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सतत सावध राहण्याचे आवाहन करत आहेत.
देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचे निधन झाले आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेल्या 64 वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज सकाळी त्यांचे निधन झाले. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेल्यानंतर राजेश टोपे यांनी तात्काळ बैठक बोलावली असून कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रातील नेत्यांशी चर्चा करत असल्याचे समजत आहे. नेमकी ही बैठक कशासाठी बोलावली आहे, काही वेळातच स्पष्ट होईल. सध्या नागरिकांमध्ये भिती पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. हे देखील वाचा-Coronavirus Outbreak In India: कर्नाटक मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 76 वर्षीय रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही COVID-19 ची लागण
एएनआयचे ट्वीट-
कोरोना व्हायरस संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या मृतांच्या आकडेवारीत घट झाल्याचे समजत आहे. यामुळे कोरोना व्हायरचे प्रमाण लवकरच कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, इटली कोरोना व्हायरसशी झुंज देत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर इराण, अमेरीका, भारतासह अनेक देशांत कोरोना व्हायरचे रुग्ण आढळू लागले आहे. सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे.
सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे. यातच राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोरोनासंबंधित माहिती दिली. पिंपरी चिंचवड- 9, पुणे- 7, मुंबई- 6, नागपूर- 4, यवतमाळ- 3, कल्याण- 3, नवी मुंबई- 3, राजगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आल्याची माहिती टोपे यांनी दिली होती. यातच मुंबई येथील आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.