मुंबई: म्हशीच्या दूध दरामध्ये 1 एप्रिल पासून 2 रूपयांनी वाढ; मुंबई, ठाणे येथील नवे दूध दर काय?

तर शहरात रिटेल दरभाव 70 वरून 72 रूपये केला जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

1 एप्रिलपासून मुंबईकरांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. मुंबईमध्ये म्हशीचं सुटं दूध (Buffalo Milk) आता दोन रूपयांनी महागणार आहे. पण गोकूळ, महानंदा, अमूल यासारख्या पॅकेज्ड दूध विक्रेत्यांच्या दूध दरामध्ये मात्र कोणतीही वाढ होणार नाही. मुंबई आणि ठाणे भागातील दूध उत्पादक असोसिएशनच्या सुमारे 17,00 डेअरींनी घेतलेल्या निर्णयानुसार, दूधाचा होलसेल रेट 64 वरून 66 रूपये केला जाईल. तर शहरात रिटेल दरभाव 70 वरून 72 रूपये केला जाणार आहे.

सध्या गोठ्यामध्ये काम करणार्‍यांची कामगारांची संख्या वाढवली जाणार आहे, गुरांच्या चार्‍यासठी लागणारा खर्च सतत वाढतअसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 2 रूपयांच्या वाढीसोबत 2 रूपयांची वाढ सहा महिन्यांसाठी म्हणजे सप्टेंबर 2019 पर्यंत लागू राहणार आहे. यासोबत पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्चदेखील असल्याने मुंबईकरांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईत सुमारे 45 लाख लीटर दूध दररोज पोहचवले जाते. भेसळ टाळण्यासाठी अनेक मुंबईकर पॅकेज्ड आणि ब्रॅन्डेड कंपन्यांऐवजी खाजगी दूध डेरीमधून दूध घेणं पसंत करतात. पण आता दूध दरवाढीमुळे मुंबईकरांचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.