Mumbai Lok Sabha Election 2024: मुंबई मध्ये 20 मे दिवशी बॅंका, दारूची दुकानं ते हॉस्पिटलं नेमकं काय खुलं राहणार काय बंद राहणार?

महाराष्ट्रात 20 मे दिवशी अंतिम टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे.

Vote | File Images

मुंबई मध्ये 20 मे दिवशी लोकसभा निवडणूक (Mumbai Lok Sabha Election) होणार आहे. महाराष्ट्रातील हे पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आहे. मुंबईत 6 जागांवर लोकसभेचं मतदान होणार आहे. तर राज्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. संपूर्ण एमएमआरचा (MMR) यामध्ये समावेश असणार आहे. अधिकाधिक लोकांना मतदानाचा आपला हक्क बजावता यावा म्हणून शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मग या सुट्टीच्या दिवशी नेमकं मुंबईत काय सुरू राहणार आणि बंद असणार? हे एकदा नक्की पहा. Lok Sabha Elections 2024: मतदार कार्ड नाही? मग पहा कोणत्या ओळखपत्रांच्या मदतीने करू शकाल मतदान ! 

मुंबई मध्ये 20 मे दिवशी काय सुरू, काय बंद राहणार?

शाळा-कॉलेज बंद:

निवडणूकीच्या प्रोटोकॉल नुसार मतदानाच्या दिवशी शालेय संस्था ज्यामध्ये शाळा, कॉलेजचा समावेश असतो त्या बंद राहणार आहेत.

शासकीय सेवा बंद:

अत्यावश्यक नसलेल्या शासकीय सेवा 20 मे दिवशी बंद राहणार आहेत.

BSE/NSE बंद राहणार

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज 20 मे दिवशी बंद राहणार आहे. या दिवशी मतदान करण्यास अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

दारूची दुकानं बंद

मुंबई मध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 18 मे च्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून 20 मे च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं बंद राहणार आहेत. यामध्ये सारे बार, वाईन शॉप्स यांचा समावेश असणार आहे.

बॅंक हॉलिडे

20 मे हा बॅंक हॉलिडे असल्याने यादिवशी सार्‍या बॅंका बंद राहणार आहेत.

मुंबई मध्ये 20 मे दिवशी काय सुरू असेल?

वाहतूक व्यवस्था

मुंबई मध्ये 20 मे दिवशी सारी वाहतूक सुरू राहणार आहे. नागरिकांना ट्रेन, बस, मेट्रो यांचा सुरळीत वापर करता येणार आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी खास विशेष सेवा देखील उपलब्ध राहणार आहेत. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: मुंबईकरांना 20 मे रोजी मेट्रो प्रवासात मिळणार 10 टक्के सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी Mumbai Metro चा प्रयत्न .

हॉस्पिटल, मेडिकल

हॉस्पिटल सह अन्य मेडिकल सेवा 20 मे दिवशी नियमित सुरू ठेवल्या जाणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याला प्राधान्य देत आरोग्य सेवा खुल्या ठेवल्या जातील.

व्यावसायिक आस्थापनं

मुंबई शहरामध्ये व्यावसायिक आस्थापनं खुली ठेवली जाणार आहेत. मात्र काही दुकानं थोडी उशिराने उघडण्याची शक्यता आहे. दुकान किंवा आस्थापनांमधील कर्मचार्‍यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काही वेळ मोकळीक देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान 20 मे दिवशी मुंबई सोबतच नवी मुंबई, ठाणे, नाशिक, दिंडोरी, डोंबिवली, कल्याण या भागातही मतदान होणार आहे. सध्या दिवसा कडक ऊन असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उन्हात बाहेर पडणार असल्यास सुती कपडे घालण्याचे, छत्री, गॉगल, स्कार्फ, टोपीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.