IPL Auction 2025 Live

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून धावणार 40 अधिक लोकल फेर्‍‍या

दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर याआधीपासूनच सुमारे 162 ट्रेन्स चालवल्या जात आहेत.

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

मुंबईची लाईफलाईन असणार्‍या लोकल ट्रेनला सध्या कोविड संकटातही मर्यादित स्वरूपात चालवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र सरकारी आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आलेली ही रेल्वेसेवा आता पश्चिम रेल्वे मार्गावर वाढवली जात आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज (29 जून) पासून या मार्गावर 40 नव्या फेर्‍या चालवल्या जाणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर याआधीपासूनच सुमारे 162 ट्रेन्स चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने मुंबई लोकल चालविणा-या मोटरवुमनचा फोटो शेअर करून प्रवाशांना दिला महत्त्वाचा संदेश.  

23 मार्चपासून भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला आणि सुमारे 84 दिवस मुंबई लोकल सेवा ठप्प होती. आता 15 जून पासून काही अंशी लोकल सेवा सुरू झाली आहे मात्र अद्याप त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा नाही. सध्या केवळ शासनाकडून परवानगी असलेल्या कर्मचार्‍यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. परंतू वाढती गर्दी पाहता आता पश्चिम रेल्वे मार्गावर काही ट्रेन्स वाढवल्या जात आहेत.

पश्चिम रेल्वे 40 नव्या लोकल सेवा कशा असतील?

चर्चगेट- बोरिवली स्थानकावर - प्रत्येकी 10 धीम्या अप आणि डाऊन दिशेने

बोरिवली - वसई स्थानकावर - 2 धीम्या डाऊन दिशेने

वसई - चर्चगेट स्थानकावर - 2 जलद अप दिशेने

विरार - बोरिवली स्थानकावर - 2 धीम्या अप दिशेने

चर्चगेट - विरार स्थानकावर - 8 डाऊन आणि 6 अप दिशेने

पश्चिम उपनगरांमध्ये मुंबईच्या चर्चागेट पासून डहाणू परिसरात राहणारे नागरिक पश्चिम रेल्वेचा वापर करतात तर छत्रपती शिवाजी महाराज टर्निनस ते कसरा, खोपोली या स्थानकांदरम्यान मुंबई लोकलची मध्य रेल्वे धावते.