Mumbai Local Trains: सर्वसामान्यांनाही आता लोकलमधून प्रवास करता येणार? पाहा काय म्हणाले महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहेत. त्यामुळे येत्या 1 ऑगस्टपासून मुंबईत लॉकडाऊन वाढवला जाणार की अनलॉक करण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहेत. त्यामुळे येत्या 1 ऑगस्टपासून मुंबईत लॉकडाऊन वाढवला जाणार की अनलॉक करण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh chahal) यांनी लोकल ट्रेन (Mumbai Local Trains)सुरु करण्यातबाबत आपले मत मांडले आहे. मुंबईचा रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यावर गेला आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यास रुग्णवाढीचा दर 64 दिवसांवर येईल. त्यामुळे आपण लोकल ट्रेनही सुरू करू शकतो, असे इक्बालसिंग चहल म्हणाले आहेत.
मुंबईत रेल्वे सुरू झाली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मुंबईची लोकसंख्या 20 मिलियन आहे. त्यामुळे शहरात किमान 200 हॉस्पिटल आणि बेड्सची दिवसाला गरज आहे. पूर्वी पेक्षा मुंबईची स्थिती आता खूप चांगली आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या 2 कोटी आहे. त्यामुळे एकदा का लोकल सुरू केली तर, रेल्वेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कल्याण आणि नालासोपाऱ्याहून मोठ्या प्रमाणावर लोक येतील. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आली तर, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व काही सुरू करण्याची विनंती करेल, असे इक्बालसिंग चहल म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Recovery Rate Improved In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला; मुंबई महानगरपालिकेची माहिती
मुंबईत शुक्रवारपर्यंत सकारात्मक रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.09 होता. मात्र, शनिवारी तो 1.06% वर गेला आहे. ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबईतील सकारात्मक रुग्णांचे डबलिंग रेटही 66 दिवसांवर गेला आहे. ज्यामुळे मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)