कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा लोकलच्या गर्दीत पडून दुर्दैवी मृत्यू

नेहा ठगे (Neha Thage) नामक ही चिमुकली मूळ विदर्भाची रहिवाशी असून आपल्या आई सोबत परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Tata Memorial Hospital) उपचारासाठी जात होती.

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

मुंबई लोकल मधून पडून निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्याचे अनेक प्रसंग नेहमी समोर येतात, मात्र मागील आठवड्यात चेंबूर (Chembur) रेल्वे स्थानकात घडलेली घटना ही खरोखरच हृदय पिळवटून टाकणारी आहे. आयुष्याची शर्थ करत कॅन्सरशी (Cancer Patient) लढा देणाऱ्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीचा लोकल मधून पडून मृत्यू झाल्याचे समजत आहे. नेहा ठगे (Neha Thage) नामक ही चिमुकली मूळ विदर्भाची रहिवाशी असून आपल्या आई सोबत परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Tata Memorial Hospital) उपचारासाठी जात होती. ट्रेनच्या गर्दीत या दोघी रेटल्याने प्लॅटफॉर्मवर पडल्या यावेळी धक्क्याने नेहा आईच्या हातून सटकली. काही लक्षात येण्याच्या अगोदरच लोकांचे पाय पडल्याने या चिमुकलीला गंभीर जखम झाली होती,सोबतच नेहाच्या आईच्या डोळ्यांना सुद्धा मर बसला होता. यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताबडतोब जवळील राजावाडी हॉस्पिटल (Rajawadi Hospital)  मध्ये नेण्यात आले मात्र ICU मध्ये उपचार सुरु असताना नेहाचा 9 सप्टेंबर रोजी दुर्दैवी अंत झाला.

TOI च्या माहितीनुसार, नेहा ठगे हिचे कुटुंब विदर्भातील वाशीम जिल्ह्यीत राहत होते. यावर्षीच्या सुरुवातीला नेहाचे पाय आणि पोटात वेदना होत होत्या, स्थानिक डॉक्टरांना याचा अंदाज येत नसल्याने तिला परळ येथील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले , तिथेच तिला ट्युमर असल्याचे निदान झाले. हे सर्व धीराने घेत ठगे कुटुंबीयांनी तिला टाटा रुग्णालयात दाखल केले मागील पाच महिन्यांपासुन तिच्यावर उपचार सुरु होता. अशातच तिची प्रकुरतु हेलकावत होती ट्युमर शरीरात पसरू लागला होता पण तरीही ही चिमुकली नेटाने या साऱ्याचा सामना करत बोलू चालू लागली होती. काही दिवसात डॉक्टरांनी केमोथेरेपीला सुरुवात केली असता नेहाने त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.

(हे ही वाचा - सात तासांत, सात प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू- मध्य रेल्वे मार्गावरील भयंकर परिस्थिती)

दरम्यान, या साऱ्याचा खर्च अगोदरच अधिक असल्याने एका संस्थेने ठगे कुटुंबाची चेंबूर येथे राहण्याची सोय केली. पण रोजच्या प्रवासातही त्यांचे बरेच पैसे जात असल्याने त्यांनी पर्यायी स्वस्त मार्ग शोधण्यास सुरुवात केली. मग रोज लोकल ट्रेनने प्रवास करत चेंबूर व तिथून पुढे शिवडीला उतरुन टॅक्सी ते टाटा हॉस्पिटल गाठत ही दिनचर्या सुरु झाली. मागील आठवड्यात पैशांची सोय करण्यासाठी म्ह्णून नेहाचे वडील वाशीमला गेले होते,आणि तेव्हाच हा सारा प्रकार घडला. वास्तविक कँसर रुग्णांसाठी हॉस्पिटलतर्फे देखील राहण्याची सोय केली जाते मात्र सर्वांना सामावून घेणे शक्य नव्हते असे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकारानंतर नेहाचे वडील शिवनंदन आणि आई सह ठगे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif