Mumbai Local Power Block: कल्याण जवळील पत्री पूलाचे काम सुरु असल्याने 21, 22 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; पहा संपूर्ण वेळापत्रक

पहिले दोन ब्लॉक्स हे 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी असतील.

Mumbai Local (Photo Credits: PTI)

कल्याण (Kalyan) जवळील पत्री पूलासाठी (Patri Pool) रेल्वेमार्गावर 76.67 मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर सुरू असल्याने मध्य रेल्वेवर (Central Railway) चार ब्लॉक्स (4 Blocks) घेण्यात येणार आहेत. पहिले दोन ब्लॉक्स हे 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी असतील. तर पुढील दोन ब्लॉक्स 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी असतील. शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.15 ते दुपारी 2.15 पर्यंत पहिला ब्लॉक असेल आणि रविवार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.50 ते दुपारी 1.50 पर्यंत दुसरा ब्लॉक असेल. (Mumbai Local Updates: नेरूळ/बेलापूर - खारकोपर मार्गावर धावणार 20 नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेच्या 8 नव्या फेर्‍या)

पहिल्या ब्लॉकमुळे डोंबिवली आणि कल्याण स्टेशनवरुन सुटणाऱ्या ट्रेन्स रद्द करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान कल्याण आणि कर्जत/कसारा दरम्यान स्पेशल ट्रेन्स चालवण्यात येतील, तसंच सीएसएमटी आणि कुर्ला/ठाणे/डोबिंवली दरम्यानही स्पेशल ट्रेन्स सुरु राहतील. रविवारी असणाऱ्या दुसऱ्या ब्लॉक दरम्यान सकाळी 9.20 ते दुपारी 1.50 या कालावधीतील डोंबिवली, कल्याण येथील सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच या कालावधीतही कल्याण आणि कर्जत/कसारा दरम्यान आणि सीएसएमटी आणि कुर्ला/ठाणे/डोबिंवली दरम्यान स्पेशल ट्रेन्स धावतील.

Central Railway Tweet:

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अद्याप सर्व सामान्यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. मात्र महिलांना आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासूनच रेल्वेने प्रवास करता येत होता. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी लोकल फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली होती.