मुंबई: धावत्या लोकलमधून 6 महिन्याच्या गर्भवती महिलेला नवऱ्याने ढकलले, गर्भपात करण्यासाठी होता दबाव

तर एका 20 वर्षीय 6 महिन्याच्या गर्भवती महिलेला लोकलमधून नवऱ्याने ढकलले असून त्यामागील कारण म्हणजे तिच्यावर गर्भपात करण्याचा दबाव आणण्यात आला होता.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई लोकल मधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तर एका 20 वर्षीय 6 महिन्याच्या गर्भवती महिलेला लोकलमधून नवऱ्याने ढकलले असून त्यामागील कारण म्हणजे तिच्यावर गर्भपात करण्याचा दबाव आणण्यात आला होता. ही घटना दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सागर धोडी असे नवऱ्याचे नाव असून पीडित महिला त्याची दुसरी बायको होती. या दोघांमध्ये घटना घडण्यापूर्वी काही कारणास्तव वाद झाले होते. मात्र लोकल धिम्या गतीने जात असल्याने पीडित महिला त्यामधून पडल्यानंतर थोडक्यात बचावली गेली.

राणी असे पीडित महिलेचे नाव आहे. राणी आणि सागर यांच्यामध्ये नवजात बालक नको म्हणून लोकमध्ये वाद सुरु होते. या दरम्यान त्याने तिच्यावर गर्भपात करण्याचा सुद्धा दबाव आणला होता. मात्र सागर याने तिला लोकलमधून ढकलून दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. तर सागर याचे यापूर्वी जरी लग्न झाले असले तरीही राणी हिच्यासोबत प्रेमप्रकरण होते. आधीच्या बायकोपासून सागर याला दोन मुले सुद्धा आहेत.(पुणे: प्रियकरासोबत लग्न करण्याचा हेतूने पत्नीनेच केला पतीचा खून; दोघेही पोलिसांच्या ताब्यात)

राणीबाबत पहिल्या बायकोला समजले असता तिने सागरचे घर सोडले. तर 1 नोव्हेंबरला सागर याने राणी सोबत लग्न केले. परंतु राणी ही लग्नापूर्वीच गर्भवती होती. यावर सागर याला नवजात बाळ नको होते पण राणी हिला आपल्या बाळाचा गर्भपात करायचा नसल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. सतत भांडणातून कंटाळलेल्या राणी आपल्या मायदेशी निघून गेली. त्यानंतर सागरने तिला भेटला. तसेच राणीला त्याच्याबरोबर नालासोपारा येथील मित्राच्या ठिकाणी येण्यास सांगितले असता तिने सहजपणे मान्य केले. लोकलने प्रवास करताना दोघे दरवाज्याच्या बाजूला उभे होते. राणी हिला लोकलमधून ढकलण्यापूर्वी सागरने तिला मारले. राणीला यामुळे दुखापत झाली आहे मात्र बाळ बचावले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.



संबंधित बातम्या