लग्न करण्याचा हेतूने पतीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील हडपसर (Hadapsar) भागात शुक्रवारी घडली. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच राहत्या घरात आपल्या पतीचा खून करुन 3 दिवस मृतदेह बेडखाली झाकून ठेवला. दरम्यान, मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन सरु असल्याचे पोलिसांनी खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबधित ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. प्रियकर आणि पत्नी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.
आयुज शेख असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिना आयुज शेख आणि मोहसीन शेख यांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबध होते. आयुज यांच्या सोबत लग्न झाल्यानंतरही हिना आणि मोहसीन शेख यांच्यात प्रेमसंबध सुरुच होते. आयुजमुळे दोघांना लग्न करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे दोघांनी आयुज याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार हिना आणि मोहसीन यांनी शुक्रवारी आयुज याचा खून करुन त्याचा मृतदेह बेडखाली ठेवला. परंतु, पोलिसांच्या खबऱ्याला या संदर्भात माहिती मिळाली. खून झाल्याची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना अटक केली. तसेच आयुज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हे देखील वाचा-सोलापूर: दिवाळीत माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी प्रयत्न सुरु केले असताना शेजारील एका व्यक्तीला समजले. त्यानंतर पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही आरोपीने खुनाची कबूली दिली असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.