
मुंबई लोकल (Mumbai Local) मध्ये अति गर्दीने आज (9 जून) पुन्हा 5-8 प्रवाशांचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात काही प्रवासी रेल्वे ट्रॅक वर पडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या रेल्वे अपघातामध्ये जखमींवर सध्या कळवा येथील शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने सकाळी 9.30 च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती दिली आहे. कसारा आणि सीएसएमटी अशा दोन विरूद्ध दिशेने जात असलेल्या ट्रेन मधील प्रवाशांचा धक्का लागून काही जण खाली कोसळल्याचे मध्य रेल्वे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितलं आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी गर्दीच्या वेळी फूट बोर्ड वर उभं राहून प्रवास करत होते. एकाची बॅग मागच्या बाजूला होती. त्या बॅगा एकमेकांवर घासल्याने काही जण कोसळल्याचं एका जखमीने सांगितल्याचं सीपीआरओंनी सांगितलं आहे. 8 प्रवासी धावत्या लोकल मधून ट्रॅक वर पडले आहेत. यामध्ये सारे प्रवासी हे लोकल ट्रेनचे होते. दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सनुसार पुष्पक ट्रेनच्या प्रवाशांसोबत ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र सीपीआरओंनी पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या अपघाताचा मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. Mumbai Local Video: मुंबई लोकल मधून थेट FOB वर चढण्यासाठी प्रवाशांचा भयंकर जुगाड; व्हिडिओ झाला वायरल (Watch Video).
CPRO Swapnil Dhanraj Nila यांनी दिली रेल्वे अपघाताची माहिती
#WATCH | On the Mumbra railway mishap, CPRO, Central Railway, Swapnil Dhanraj Nila says, "The first information given by the guard of the Kasara-bound local train was that six passengers were seen lying injured on the down-through track. Once the ambulances reached the spot, we… pic.twitter.com/DAcZgvgYL0
— ANI (@ANI) June 9, 2025
सुरक्षित प्रवासाकडे अधिक लक्ष देणार
आता मध्य रेल्वेकडे येणार्या नवीन लोकल मध्ये सारे दरवाजे आपोआप बंद होणारे असतील असं CPRO कडून सांगण्यात आले आहेत. कामाच्या वेळा सकाळच्या असल्याने रेल्वेवर ताण असतो त्यामुळे कामाच्या वेळांमध्ये थोडा बदल झाला तर रेल्वे वरील ताण कमी करता येईल असा देखील विचार केला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सकाळच्या वेळेस ट्रेन वाढवण्याचा विचार सुरू आहे. इंफ्रास्ट्रॅक्चर अपग्रेड करण्याचा विचार आहे असं सांगण्यात आले आहे. कल्याण कसारा तिसर्या रेल्वे लाईनचं नियोजन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान अपघातामधील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतू सारे प्रवासी हे लोकल ट्रेन मधील होते.