Mumbai: कुलाबा येथील वकील-सिनेमा निर्माता याला POCSO कायद्याअंतर्गत अटक

तर आरोपीने 17 वर्षीय कॉलेजमधील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेला मॉडलिंग आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून देतो असे सांगितले.

Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

Mumbai: कुलाबा येथील एका 53 वर्षीय वकील-सिनेमा निर्मात्याला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर आरोपीने 17 वर्षीय कॉलेजमधील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेला मॉडलिंग आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून देतो असे सांगितले.आरोपीने स्वत:ला तो स्वतंत्र एडिटर, वकिल आणि सिनेमा निर्माता असल्याचे सांगितले. तसेच त्याचे सोशल मीडियात काही चॅनल्स असल्याचे ही म्हटले. कुलाबा पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 354ए आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला कोर्टाच्या समोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

7 जानेवारीला पीडिता कुलाबा येथील पिझ्झारिया येथे तिच्या आईसोबत काकांचा वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी त्या व्यक्तीने मुलीच्या दिसण्यावरुन कौतुक केले. त्याचसोबत ही मुलगी ग्लॅमरच्या जगात आणि मॉडेलिंगमध्ये करियर करु शकते असे म्हटले. त्याने त्याचा मोबाईल क्रमांक शेअर करत तिला त्याच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलावले. असे मुलीच्या आईने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले.(Maharashtra: जळगावात मकर संक्रतीच्या सणा दिवशी दोन दुर्देवी घटना, पंतगांनी घेतला दोन मुलांचा जीव)

दुसऱ्या दिवशी मुलीची आई आणि त्या दोघी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या. तेथे अन्य काही मॉडेल्सचे फोटो लावण्यात आले होते. त्यामुळे तुमच्या सुद्धा मुलीला या मॉडेल इंडस्ट्रीमध्ये करियर करण्यास मदत करु शकतो असे त्याने म्हटले. त्यामुळे मुलीला त्याने त्याच्या ऑफिसमध्ये भेटल्यानंतर येण्यास सांगितले.

9 जानेवारीला जेव्हा मुलगी त्याच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्याने तिला काही कपडे घालण्यासाठी दिले. ज्या रुममध्ये त्याने तिला कपडे आलटूनपालटून घालण्यास सांगितले होते तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि फुटेज जप्त केले असून अधिक तपास करत आहेत. या व्यतिरिक्त आरोपीने तिला त्याच्या बाईकवरुन विविध शूटच्या ठिकाणी नेले. तसेच तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणखी धक्कादायक म्हणजे त्याने मुलीला तिच्या छातीचा आकार आणि अन्य भाग याबद्दल ही विचारले.