बृहन्मुंबई, नाशिक,लातूर सह या 6 महानगरपालिकांमध्ये 9 जानेवारी 2020 ला होणार रिक्तपदांसाठी मतदान; जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

या रिक्तपदांच्या पोटनिवडणूका 9 जानेवारीला होणार असून त्याचा निकाल 10 जानेवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे.

Elections | (Photo Credits: PTI)

Local Body By Elections 2020:  मुंबई महानगरपालिका सह नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर, पनवेल सोबत 6 महानगरपालिकांमधील 7 रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्तपदांच्या पोटनिवडणूका 9 जानेवारीला होणार असून त्याचा निकाल 10 जानेवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे. नाशिक- 22अ आणि 26अ, मालेगाव- 12 ड, नागपूर- 12ड, लातूर- 11अ, पनवेल- 19ब आणि बृहन्मुंबई- 141 या प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; 7 जानेवारीला मतदान आणि 8 तारखेला मतमोजणी

महाराष्ट्र राज्यातील पोटनिवडणूका वेळापत्रक

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जानेवारीला सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेमध्ये 7 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा वेळ: 16 ते 23 डिसेंबर 2019

दरम्यान 22 डिसेंबर दिवशी शासकीय सुट्टी असल्याने त्या दिवशी फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

नामनिर्देशनपत्रांची छाननी : 24 डिसेंबर

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत: 26 डिसेंबर 2019

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 27 डिसेंबर 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. तर 9 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या सात जागांवरील मतमोजणी 10 जानेवारी दिवशी असेल. त्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.