बृहन्मुंबई, नाशिक,लातूर सह या 6 महानगरपालिकांमध्ये 9 जानेवारी 2020 ला होणार रिक्तपदांसाठी मतदान; जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

मुंबई महानगरपालिका सह नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर, पनवेल सोबत 6 महानगरपालिकांमधील 7 रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्तपदांच्या पोटनिवडणूका 9 जानेवारीला होणार असून त्याचा निकाल 10 जानेवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे.

बृहन्मुंबई, नाशिक,लातूर सह या 6 महानगरपालिकांमध्ये 9 जानेवारी 2020 ला होणार रिक्तपदांसाठी मतदान; जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Elections | (Photo Credits: PTI)

Local Body By Elections 2020:  मुंबई महानगरपालिका सह नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर, पनवेल सोबत 6 महानगरपालिकांमधील 7 रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्तपदांच्या पोटनिवडणूका 9 जानेवारीला होणार असून त्याचा निकाल 10 जानेवारी दिवशी जाहीर केला जाणार आहे. नाशिक- 22अ आणि 26अ, मालेगाव- 12 ड, नागपूर- 12ड, लातूर- 11अ, पनवेल- 19ब आणि बृहन्मुंबई- 141 या प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; 7 जानेवारीला मतदान आणि 8 तारखेला मतमोजणी

महाराष्ट्र राज्यातील पोटनिवडणूका वेळापत्रक

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जानेवारीला सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेमध्ये 7 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा वेळ: 16 ते 23 डिसेंबर 2019

दरम्यान 22 डिसेंबर दिवशी शासकीय सुट्टी असल्याने त्या दिवशी फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

नामनिर्देशनपत्रांची छाननी : 24 डिसेंबर

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत: 26 डिसेंबर 2019

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 27 डिसेंबर 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. तर 9 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या सात जागांवरील मतमोजणी 10 जानेवारी दिवशी असेल. त्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2019 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).