केईएम मधील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला, 10 वर्षीय मुलीला सुद्धा COVID19 चे संक्रमण
त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच कारणामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. याच दरम्यान, केईएम रुग्णालयात परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता महिला नर्सच्या नवऱ्याला आणि 10 वर्षाच्या मुलीला ही कोरोनाची लागण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात बुधवारी 3 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 2 रुग्ण हे पालघर आणि एक रुग्ण डहाणू मधील आहे. तसेच वसई तालुक्यात सुद्धा 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सदर व्यक्ती वसई तालुक्यातील कामन मधल्या पोमन येथील रहिवासी आहे. या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली असून तो मुंबई फिल्म स्टुडिओमध्ये कॅमेरामॅन म्हणून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.(महाराष्ट्रातील पोलीस दलातील 1001 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे. तसेच 19400 कोविड19 च्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरु असून 975 जणांचा बळी गेला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाचा वेग संथ करण्यास आपल्याला यश आहे आहे. परंतु अद्याप कोरोनची साखळी तुटलेली नाही असे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तर आज उद्धव ठाकरे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांच्या समवेत कोरोनाच्या परिस्थितीत एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती.