कल्याण: विशिष्ट पुस्तके न घेतल्याने सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थ्यांना मारहाण, पालकांचे आंदोलन

Mary's High School) विद्यार्थ्यांना शाळेकडून सांगण्यात आलेली पाठ्यपुस्तके न घेतल्याने मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

कल्याण (Kalyan) येथील सेंट मेरी शाळेने (St. Mary's High School) विद्यार्थ्यांना शाळेकडून सांगण्यात आलेली पाठ्यपुस्तके न घेतल्याने मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. तसेच शाळेच्याविरोधात पोलिसात पालकांनी धाव घेत या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

सेंट मेरी शाळेने यंदा फी दरवाढ आणि स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके घेऊ नका असे सांगितले. त्याचसोबत शाळेकडून सांगण्यात आलेली विशिष्ट पुस्तकेच विद्यार्थ्यांनी खरेदी करावीत असे सुद्धा सांगण्यात आले. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे नवी पाठ्यपुस्तके नाहीत त्यांना शिक्षकांकडून शिक्षा करण्यात आली. अशा प्रकारामुळे पालकांनी शाळेच्या विरोधात संताप व्यक्त केला.(वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देणे सक्तीचे नाही, विनोद तावडे यांची घोषणा)

त्याचसोबत विद्यार्थ्यांकडे नवीन पाठ्यपुस्तके नाहीत म्हणून दोघांना मारहाणसुद्धा केली. परंतु पालकांनी आक्रमक पवित्रा घेऊनसुद्धा शाळेने त्यांच्या वागण्यात बदल केला नाही. त्यामुळे सकाळी पालकांनी शाळेबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. तर पालकांचे आंदोलन पाहून शाळेच्या प्रशासनाने शाळेला कुलूप लावत बंद असल्याचे सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif