Uddhav Thackeray on Hindutva: एकमेकांचा द्वेष करणे हेच तुमचं हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे याचा भाजप नेतृत्वाला सवाल

खरा हिंदू असतो तो आव्हान स्वीकारणारा असतो. आज मी आपल्याला आव्हान देतो.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

तुमचं हिंदुत्त्व नेमकं काय आहे? एकमेकांमध्ये द्वेश निर्माण करणं हेच खरं तुमचं हिंदुत्त्व आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भाजप आणि भाजप नेतृत्वावर जोरदार निशाणा (Uddhav Thackeray on Hindutva) साधला. खरा हिंदू असतो तो आव्हान स्वीकारणारा असतो. आज मी आपल्याला आव्हान देतो. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असे म्हणत उद्धव यांनी सत्ताधारी भाजपला आव्हानही दिले. उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) मुंबई येथे उत्तर भारतीय नागरिकांची एक बैठक घेतली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांना संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण सर्वजण हिंदू आहोत. त्यामुळे आपण एकमेकांना वेगळं मानत नाही. आता भारतीयांनाही उत्तर हवे आहे हिंदुत्त्व म्हणजे नेमकं काय? मी मुख्यमंत्री असताना तर कोरोना काळ होता. अशा काळातही मी कधी भेदभाव केला नाही. मी कधीही मराठी, अमराठी, उत्तर भारतीय असा भेदभाव केला नाही. (हेही वाचा, Aditya Thackeray On Governor Resignation: हा राज्याचा मोठा विजय! भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया)

ट्विट

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, शिवसेना नेहमी रक्तदान शिबीर घेते. आपण कधीही विचार करतो का हे रक्त कोणाच्या शरीरात जाते. रक्त घेणारा हिंदू आहे की मुस्लिम आहे की ख्रिश्चन अथवा इतर कोणी आहे? सध्या जे काही सुरु आहे त्याने देशाची मान खाली जात आहे. हे वेळीच थांबवलं पाहिजे. आमच्या शिवसेनेच्या शाखेवर सर्व जाती-धर्माचे लोक येतात. उत्तर भारतीय, मुस्लीम, मराठी सगळे येतात. कधीही भेदभाव होत नाही. पण निवडणुकीच्या वेळी मात्र भेदभाव कसा होतो? अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.