Mumbai Traffic: मुंबईत दुचाकींची संख्या वाढली, सुधारीत बससेवेमुळे लोकल ट्रेन प्रवाशांच्या संख्येत घट; तज्ज्ञांचा दावा

कोरोना निर्बंध हटवून बराच काळ झाला तरीही मुंबई लोकल (Mumbai Local Train) प्रवाशांच्या संख्येत पूर्वीसारखी वाढ झाली नाही. अभ्यासकांनी दावा केला आहे की, मुंबईकरांची वाहतुकीबद्दलची मते बदलली आहेत. मुंबई शहरात मुंबई बस वाहतूक (Mumbai Bus Transport) अधिक सक्षम झाली आहे.

Mumbai Traffic | (Photo Credit -Twitter)

कोरोना काळात घातलेले निर्बंध आता पूर्ण हटवले गेले आहेत. कोरोना निर्बंध हटवून बराच काळ झाला तरीही मुंबई लोकल (Mumbai Local Train) प्रवाशांच्या संख्येत पूर्वीसारखी वाढ झाली नाही. अभ्यासकांनी दावा केला आहे की, मुंबईकरांची वाहतुकीबद्दलची मते बदलली आहेत. मुंबई शहरात मुंबई बस वाहतूक (Mumbai Bus Transport) अधिक सक्षम झाली आहे. दुसऱ्या बाजूला दुचाकीस्वारांची संख्याही मोठी वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांनी लोकल ट्रेन ( Local Train) प्रवासाकडे पाठ फिरवली आहे, असेही हे तज्ज्ञ सांगतात.

अभ्यासकांच्या मते कोविड महामारीपूर्वी मुंबई लोकल ट्रेनमधून प्रतिदिन 80 लाख प्रवासी प्रवास करत होते. सध्या प्रवाशांची ही संख्या 60 लाखांच्या आसपास आहे. दरम्यान, लोकलच्या फेऱ्याही मधळ्या काळात वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई लोकल प्रवासात आता वातानुकूलीत लोकल सेवेचीही भर पडली आहेत. अर्थात एसील लोकल तिकीट दर आणि त्याची वारंवारता याबाबत प्रवाशांच्या मनात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांच्या एका मोठ्या गटाचा एसील लोकलला विरोध आहे. दुसऱ्या बाजूला एसील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. (हेही वाचा, Mumbai Traffic: दक्षिण मुंबईतील ‘या’ मार्गावर वाहतुक मार्गात मोठे बदल, जाणून घ्या वाहतूक विभागाच्या विशेष सुचना)

दरम्यान, पाठिमागील काही काळापासून मुंबई आणि उपनगरिय बस वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. परिणामी बस सेवा अधिक सुरळीत झाली आहे. त्याचाही परिणाम मुंबईतील वाहतुक कोंडी कमी होण्यावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिवाय मुंबईकरांमध्ये वेळे आणि रहदारी या मुद्द्यावरुन बाईकची क्रेझ वाढत आहे. मुंबई लोकल, बस वाहतूक यांच्या तुलनेत दुचाकी प्रवास अधिक वेगात आणि वेळेत होतो असे लक्षात आल्याने दुचाकींची संख्याही मुंबईत वाढताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व बदल हे कोरोना नंतरच्या काळात अधिक वेगाने होऊ लागले आहेत.