Mumbai Horror: शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहणार्‍या सातवीतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाचा बलात्कार; POCSO Act खाली आरोपी अटकेत

ते देखील हॉस्टेलमध्येच राहतात.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका शाळेच्या मुख्याध्यापकाला 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी अटक केली आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत अल्पवयीन मुलगी शाळेच्या हॉस्टेल (School Hostel) मध्ये राहत होती. 65 वर्षीय मुख्याध्यापकाने विद्यार्थीनीने तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे.

Hindustan Times सोबत बोलताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला घडल्या प्रकाराबद्दल बाहेर कुठेही काहीही न बोलण्याबाबत धमकावलं होतं. कशाचीही वाच्यता झाल्यास मुलीला तिचं आयुष्य उद्धवस्त केले जाईल अशी धमकी दिली होती. दरम्यान या धमकीने ती विद्यार्थिनी घाबरली होती आणि म्हणूनच तातडीने तिने कुणाकडेही तिच्यासोबत घडल्या प्रकाराबद्दल काहीही बोलली नव्हती.

पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी हॉस्टेलमधील इतर मुलींनाही विश्वासात घेऊन त्यांच्यापैकी कुणासोबत असा काही प्रकार घडला आहे का? याची विचारपूस केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलीला सातवी इयत्तेमध्ये असल्यापासून म्हणजेच नोव्हेंवर 2022 पासून त्रास आहे. हे देखील नक्की वाचा: मुंबई सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीला बघून 'आजा आजा' संबोधणं ठरवलं Sexual Harassment; आरोपीवर POCSO Act अंतर्गत कारवाई.

पोलिस ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, पीडीत अल्पवयीन मुलीचे लहान बहीण, भाऊ देखील याच शाळेमध्ये शिकतात. ते देखील हॉस्टेलमध्येच राहतात. आता आरोपी मुख्याध्यापक पोलिसांच्या अटकेमध्ये आहे पोलिसांनी शाळेतील अन्य विद्यार्थ्यांची आणि 22 हॉस्टेल मध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे.

जेव्हा पीडितेने तिचा त्रास तिच्या पालकांना सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अ‍ॅक्ट 2012 अंतर्गत  विविध कलमांखाली आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.



संबंधित बातम्या