High Tide 5 July Time: मुंबईत आज दुपारी पुन्हा समुद्रात भरती, 4.63 मीटर उंच लाटा उसळणार- BMC

यावेळी कोणीही समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

High Tide in Mumbai | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये आज, 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी पुन्हा एकदा समुद्रात भरती (High Tide In Mumbai)  येणार असल्याचे बीएमसी (BMC) कडून सांगण्यात आले आहे. यावेळी कोणीही समुद्र किनाऱ्यापाशी जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे. आज भरतीच्या वेळी समुद्रात 4.63 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा मुंबई सह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) , रायगड (Raigad), पालघर (Palghar)  या भागात सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. हवामान खात्याने सध्या मुंबई व ठाणे येथे रेड अलर्ट (Red Alert)जारी केला असून पालघर ला सुद्धा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पुढील 36 तास पाऊस कायम राहील मात्र मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होईल असे अंदाज आहेत.

दुसरीकडे, मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे दादर मधील हिंदमाता परिसरात पाणी साचलेले पाहायला मिळतेय. या ठिकाणी बीएमसी चे कर्मचारी पंप लावून पाणी उपसण्याचे काम करत आहेत.  पाउस आणि कोरोना सहित आजच्या दिवसातील घडामोडीचे अपडेट्स जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

High Tide 5 July Time,  BMC ट्विट

हिंदमाता भागात साचले पाणी, ANI ट्विट

दरम्यान, शनिवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून दक्षिण मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रामध्ये 12 तासात 74.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ हवामान केंद्रात 132.2 मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.