Mumbai High & Low Tide During Ganesh Visarjan 2019 Days: आज होणार दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन; जाणून 3-13 सप्टेंबर दरम्यान भरती आणि ओहोटी यांचे वेळापत्रक
या काळात समुद्रात जाणार्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
Ganesh Visarjan 2019 Dates: मुंबई सह महाराष्ट्रात 2 सप्टेंबर पासून यंदाच्या गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये घराघरामध्ये विराजमान झालेले गणपती दीड, पाच, सात , दहा दिवस असतात. त्यानंतर नदी, समुद्र, पाणवठा किंवा तलावांमध्ये त्याचे विसर्जन केले जाते. दरवर्षी विसर्जनाच्या वेळेस पुरेशी सुरक्षितता न बाळगल्यास पाण्यात बुडाल्याने अनेक गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. यंदा हाच धोका टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून मुंबईकर गणेश भक्तांसाठी गणेश विसर्जनाच्या भरती आणि ओहोटीच्या वेळा जाहीर केल्या आहेत. या काळात समुद्रात जाणार्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
आज (3 सप्टेंबर) मुंबईमध्ये दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. तर 5 दिवसांचे गणपती 6 सप्टेंबर दिवशी, गौरी-गणपतींचे विसर्जन 7 सप्टेंबर दिवशी, 10 दिवसांचे गणपती अनंत चतुर्दशी म्हणजे 12 सप्टेंबर दिवशी विसर्जित केले जाणार आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवाच्या काळात आनंदाला गालबोट लागू नये तसेच दुर्दैवी अपघात टाळावेत म्हणून मुंबई पोलिसांकडून हे आवाहन करण्यात आले आहे. हेदेखील वाचा- Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?
मुंबई पोलिस ट्वीट
सध्या मुंबईत पावसाचा जोरही वाढला आहे. पुढील 48 तास मुंबईसह कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.