हल्ल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस संरक्षण देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालय आवारात हाणामारी करण्यात आली. मुंबईत आज घडलेल्या या प्रकारानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना पोलिस संरक्षण दिले आहे.
Pleas against MarathaReservation: मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या 16% आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देणार्या याचिकेचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Ad. Gunratna Sadavarte ) यांना मुंबई उच्च न्यायालय आवारात हाणामारी करण्यात आली. मुंबईत आज घडलेल्या या प्रकारानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना पोलिस संरक्षण दिले आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणार्या याचिकेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर न्यायालय परिसरात हल्ला, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
आज दुपारी अॅड. गुणरत्न सदावर्ते मीडियाशी बोलत होते. मीडियाशी बोलताना त्यांच्यावर होणार्या संभाव्य हल्ल्याची ते माहिती देत होते. "मला रोज 1000धमकीचे फोन येतात असेही गुणरत्न म्हणाले. दरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. बेसावध असताना झालेल्या हल्ल्यातून थोडा वेळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. हल्लेखोर वैजनाथ पाटील हा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे.
हल्ल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा न्यायालयात गेले. न्यायाधीशांना या हल्ल्याबाबत माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील या हल्ल्याची दखल घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस संरक्षण दिले आहे.