मुंबई: आज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन, वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याने रुग्णांना बसणार फटका

मुंबईतील (Mumbai) आज शासकीय आणि पालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा फटका त्यांना बसणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) आज शासकीय आणि पालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा फटका त्यांना बसणार आहे. याबद्दल सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन या खासजी डॉक्टरांच्या संस्थेकडून देशभरातील विविध राज्यातील रुग्णालयाती डॉक्टर्स आंदोलन पुकारणार आहे. त्यामुळे आज सरकारी आणि बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त आपत्कालीन विभाग सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून कोलकाता येथे डॉक्टरांवर  रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याने संप सुरु आहे. त्यामुळेच या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील डॉक्टरांनीसुद्धा आंदोलन सुरु केले आहे. तर कोलकाता येथील  एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. यामुळे मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी दिलेल्या उपचराबद्दल हलगर्जीपणा केल्याचे म्हटले. तसेच दोन डॉक्टरांना या नातेवाईकांनी मारहाणसुद्धा केली. जवळजवळ 200 लोकांनी डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त करत रुग्णालयावर हल्ला केला. यामध्ये दोन ज्युनिअर डॉक्टर्स गंभीर झाल्याची घटना घडली आहे.

(मुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे बाळ चोरीला)

याच कारणास्तवर देशातील विविध राज्यातील डॉक्टरांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्टरांचे हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement