Mumbai: 6 लाखांचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार; मोबाईल ट्रॅक करत पोलिसांकडून अटक

हे दोघीही दागिने पॉलिश करण्याचे काम करतात.

Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

मुंबई (Mumbai) मधील सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी 6 लाखांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघीही दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. महादेव काळे आणि विश्वजीत बोरा असे या दोन आरोपींचे नाव आहे. दुकान मालकांनी यांना 4.86 कॅरेटचे हिरे आणि 33.78 ग्रॅमचे सोन्याचे पेन्टंट पॉलिश करण्यास दिले होते. त्यानंतर या दोघांनी दागिन्यांसह तेथून पळ काढला. हिंदुस्ताथ टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. (Theft : नशा करण्यासाठी पैसे नसल्याने निवडला चोरीचा मार्ग, Mumbai पोलिसांना कळताच केली तुरूंगात रवानगी)

रिपोर्टनुसार, ही घटना 27 जुलै रोजी घडली. दागिने पॉलिश करायला दिल्यानंतर दोघे आरोपी जेवणासाठी बाहेर गेले. परंतु, संध्याकाळपर्यंत परतले नाहीत. त्यानंतर दुकान मालकाने पोलिस स्टेशनमध्ये या संबंधी तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे दोघेही आरोपी मुंबई अहमदाबाद हायवे ने पळाले असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन ट्रॅक करुन त्याचे लोकेशन अचूक शोधले आणि तिथे जावून त्यांना अटक केली. आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून चोरीचे दागिने सुद्धा जप्त केले आहेत, अशी माहिती दहिसर पोलिस स्टेशनचे असिस्टंट इन्स्पेक्टर चंद्रकांत घारगे यांनी दिली. यापैकी एका आरोपीला अहमदाबाद येथून तर दुसऱ्या आरोपीला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे.

अशा प्रकारचीच एक घटना रविवारी नवी दिल्ली येथून समोर आली होती. ग्रेटर कैलाश भागातील एका दुकानातून 70 हजार रुपये चोरुन दोघांनी पळ काढला होता. या दोघांनी खेळण्यातील पिस्तुल वापरुन दुकानातील कर्मचाऱ्यांना धमकावले आणि तेथील पैसे घेऊन पसार झाले.