Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू
अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Accident) माणगाव नजीक तिलोरे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस (Shivshahi Bus) माणगावला आली असताना हा अपघात झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. बसचं देखील नुकसान झालं आहे. (हेही वाचा - Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर)
मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला. सकाळी साडआकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे व आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे. या अपघातात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.